१९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा २०११

Saturday, April 19, 2008

shivdharm.... vishwdharm.....

लाखावर जिजाऊभक्तांनी घेतली शिवधर्माची दीक्षा

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा), ता. १२ - "मी आजपासून शिवधर्मीय होण्यासाठी प्रतिज्ञा घेत असून, परंपरागत धर्मातील रूढी-परंपरा, अंधश्रद्धांना थारा देणार नाही. कर्मकांड करणार नाही. समान न्यायावर आधारित शिवधर्माचा मी स्वीकार करीत आहे'', या शब्दांत जिजाऊसृष्टीवर देशभरातून जमलेल्या एक लाखावर जिजाऊभक्तांनी शिवधर्माची दीक्षा घेतली. .......ता. १२ जानेवारी २००५ रोजी शिवधर्म प्रकटन सोहळा झाल्यानंतर २००८ मध्ये भव्य प्रमाणात शिवधर्म दीक्षा समारोह करण्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली होती. आजच्या दीक्षा सोहळ्याने त्यांच्या या घोषणेची पूर्तता झाली. या वेळी महसूल राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखाताई खेडेकर, नेताजी गोरे, विश्‍व समन्वयक देवानंद कापसे, जयश्रीताई शेळके, प्रदीप सोळुंके, डॉ. दिलीप देशमुख, प्रभाकर पावडे, प्रकाश पोहरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवधर्माच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या शिवधर्म संसदेच्या नेताजी गोरे, चंद्रशेखर शिखरे, देवानंद कापसे, डॉ. विजयाताई कोकाटे, मंदाताई निमसे, रेखाताई खेडेकर यांनी उपस्थित लाखावर जिजाऊभक्तांना शिवधर्माची दीक्षा दिली. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना श्री. खेडेकर म्हणाले की, शिवधर्म अंगीकारून माझ्यासोबत या, आपण जगावर राज्य करू. गेल्या हजारो वर्षांपासून आमची माती होत आहे. पुढच्या पिढीचे नुकसान टाळण्यासाठी शिवधर्मात या. स्त्रिया गुलाम झाल्या की, मुले गुलाम होतात, त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची सुरुवात महिलांपासून करा. शिवधर्माच्या पद्धतीने वाटचाल केल्यास २०५० मध्ये महिला जगावर राज्य करतील. एकविसाव्या शतकातील ही पहिली धर्मक्रांती आहे. स्वर्ग, नरक यांना शिवधर्मात स्थान नसून धर्मसत्ता काबीज करण्यासाठी शिवधर्म अंगीकारा. ज्या विठ्ठलापर्यंत जाण्यासाठी दलालाची गरज लागते, त्याला दलालाच्या तावडीतून आपण मुक्त करू. व्यावसायिक बनण्याचा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. एकविसाव्या शतकात शेती पिकविणाऱ्यापेक्षा संगणक आणि लॅपटॉप पिकविणारे सुखी आहेत. तीन लाख मंदिरे ताब्यात घेऊन तीन लाख लोकांना रोजगार दिला जाऊ शकतो. आज पाच कोटी लोक दरवर्षी कर्मकांडावर प्रत्येकी किमान दोन हजार रुपये खर्च करतात. डॉ. शिंगणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जुन्या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढण्याचे अवघड काम श्री. खेडेकर करीत आहेत. त्यांच्या शिवधर्माच्या संकल्पनेतूनच माणसे गुलामगिरीतून बाहेर पडणे शक्‍य होणार आहे. शिक्षण आणि सुशिक्षित यातील दरी दूर करण्यासाठी व सामाजिक कार्यासाठी पक्षभेद विसरून काम करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. जिजाऊसृष्टीच्या उभारणीसाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी पुढील वर्षभरात देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. प्रकाश पोहरे यांनीही यावेळी विचार व्यक्त करून आपण आज शिवधर्माची दीक्षा घेतल्याचे जाहीर केले.

राजमाता जिजाऊंना स्मरण करीत शिवधर्माची

- जिजाऊसृष्टी, सिंदखेडराजा, ता. १२ - "" राजमाता जिजाऊंचे स्मरण करून विषमतावादी धर्माचे संस्कार नाकारून समतावादी शिवधर्माचा आम्ही स्वीकार करीत आहोत,'' अशा शब्दांत येथील जिजाऊसृष्टीवर उपस्थित जनसमुदायाने डॉ. विजया कोकाटे, मंदा लिमसे आणि आमदार रेखा खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शपथ घेतली. ......मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित शिवधर्म दीक्षा समारंभ घेण्यात आला. उपस्थितांनी यावेळी या नव्या धर्माचा स्वीकार शनिवारी (ता. १२) केला. त्या आधी संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवħर्माचा शिवदंड आणि धōवज नव्याने स्थापन केलेल्या धर्मसंसदेच्यľ हातात दिला आणि उपस्थितľंनी टाळ्यांचा कडकडाट केला. जिजाĊंचे जन्मस्थान अĸलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात सकाळी सहा वाजता जिजाऊ पूजन करण्यात आले. शिवाजीराजे जाधव, अण्णासाहेब बुरकुल यावेळी उपस्थित होते. राजवाड्यास भेट देण्यासाठी; तसेच तेथील जिजाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर रांगा लागलेल्या होत्या. तेथून जिजाऊ सृष्टीवरील समारंभास लोक जात होते. मराठा सेवासंघातर्फे शिवधर्मदीक्षा समारंभाआधी १२ जोडप्यांचा शिवधर्म पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. वैशाली खरे, सुधाकर साळुंके įांनी सादर केलेल्या शिवपंचकाच्या उच्चारांमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. अक्षता टाकण्याऐवजी टाळ्या वाजविण्याची शिवधर्मातील पद्धत यासाठी उपयोगात आणली गेली. प्रा. प्रदीप सोळुंके, ऍड. वैशाली डोळस हे औरंगाबादचे पदाधिकारी; तसेच यवतमाळचे पप्पू गोयल, कर्नाटकचे मांगीलाल चौपडे, राजारामबापू गायकवाड यांची सकाळच्या सत्रात भाषणे झाली. कैलास राऊत तसेच उस्मानाबादच्या कल्पना हाजगुडे यांनी सूत्रसंचालन केले. शाहिरांचे पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला. - "शिवधर्म स्वीकारण्यास आम्ही प्रतीबद्ध'(शंभर टक्के पाळण्यास वचनबद्ध) आहोत, असा उल्लेख या वेळी वक्‍त्यांनी केला. - दुपारी अडीचच्या सुमारास शिवधर्मपीठावर उपस्थित झालेल्या जनसमुदायाने परिसर फुलून गेला होता. सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी कायम होती. - शिवधर्माची केंद्र सरकारकडे नोंदणी करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांकडे या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे, अशी माहिती श्री. खेडेकर यांनी या वेळी दिली.


जिजाऊ सृष्टीवर पुस्तकांची विक्रमी विक्री

देऊळगावमही (जि. बुलडाणा), ता. १३ - मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर काल (ता.१२) जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त झालेल्या शिवधर्म दीक्षा सोहळ्यादरम्यान विक्रमी पुस्तकांची विक्री झाली. सुमारे १० लाख पुस्तकांचा खप झाला असून, त्यामध्ये आंबेडकरी साहित्याचा खप मोठ्या प्रमाणावर झाला आहे. .......मराठा सेवा संघाच्या वतीने सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म दीक्षा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी लाखो बहुजन बांधवांना शिवधर्माची दीक्षा देण्यात आली. यंदा पुस्तक विक्रेते मोठ्या संख्येने येथे आले होते. यावेळी सृष्टी परिसरात सुमारे १३० दुकाने लावण्यात आली होती. त्यामध्ये ७० दुकाने पुस्तकांची, १० दुकाने सीडी आणि कॅसेटची, सहा दुकाने छायाचित्र विक्रेत्यांची, चार दुकाने जिजाऊ मूर्ती, शिवाजी मूर्ती आणि फोटो फ्रेमची, चार दुकाने बचतगटांची, एक संगणक साहित्य विक्रीचे, ट्रॅक्‍टर, कॅलेंडर, खाद्यपदार्थ आदी दुकानांचा समावेश होता. जिजाऊ सृष्टीवर पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ७० पुस्तकांच्या दुकानातून १० लाख पुस्तकांची विक्री झाली असून, त्यामध्ये ७० टक्के आंबेडकरी साहित्याचा समावेश होता. त्याचप्रमाणे शिवधर्म साहित्याची पुस्तकेही सर्वांचे आकर्षण ठरली होती. डॉ. आ. ह. साळुंखे, मा. म. देशमुख, प्रा. अशोक राणा, प्रा. जेमिनी कडू, पुरुषोत्तम खेडेकर आदी दिग्गज लेखकांच्या पुस्तकांना यंदा मोठी मागणी होती. सातारा येथील छोट्या पुस्तक स्टॉलचे संचालक चंद्रकांत मोरे म्हणाले की, जवळपास १० हजारांची पुस्तके यंदा विक्री झाली आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर वाचक येत असल्याने, पुस्तकांची विक्रीही चांगली होते. वर्धा येथील बागडे बुक डेपोचे ईश्‍वर बागडे म्हणाले की, मोठ्या पुस्तक विक्रेत्यांची सुमारे ३० ते ४० हजार रुपयांची, तर छोट्या पुस्तक विक्रेत्यांची १० हजार रुपयांची पुस्तके विक्री झाली. त्यात आंबेडकरी साहित्याचा समावेश अधिक आहे. महाराष्ट्रातील नामवंत पुस्तक विक्रेत्यांनी येथे आपले स्टॉल लावले होते. पुण्याचे जिजाऊ प्रकाशन, शिवमाला विक्री केंद्र, परळी वैजनाथ येथील छत्रपती प्रकाशन, बुलडाण्याचे जिजाऊ पुस्तकालय, बीडचे सावंत बुक स्टॉल, वर्धेचे सुधीर प्रकाशन, बागडे बुक स्टॉल, वर्धा आदी नामवंत पुस्तक विक्रेत्यांनी यंदा हजेरी लावली होती. बहुजन व्याख्यात्यांची ऑडिओ सीडीचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. राष्ट्रमाता जिजाऊ, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, छत्रपती शाहू महाराज यांच्या मोठ्या छायाचित्रांना मोठी मागणी होती. यंदा पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाल्याने, विक्रेत्यांची मात्र चांदी झाली.

शिवाजींची तलवार लंडनमधून आणूच - श्रीकृष्ण

देऊळगावमही (जि. बुलडाणा), ता. १३ - ""लंडन येथील संग्रहालयात ठेवण्यात आलेली शिवाजी महाराजांची तलवार भारतात आणूच,'' असा विश्‍वास इंग्लंडमधील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते श्रीकृष्ण गमरे यांनी व्यक्त केला. .......तलवार भारतात आणण्यासाठी लवकरच एक समिती गठित करण्यात येणार असून, समितीच्या अध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर हे राहणार आहेत. श्री. गमरे पुढे म्हणाले, ""नव्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ज्या देशातील ऐतिहासिक वस्तू इतरत्र नेल्या असतील, त्या परत देशात आणल्या जाऊ शकतात. सावंतवाडीचे भोसले यांनी शिवाजी महाराजांची ऐतिहासिक तलवार इंग्लंडच्या राणीला दिली होती. ती तलवार लंडन येथील संग्रहालयात आहे. तेथपर्यंत जाऊन तलवारीची शूटिंग घेण्याचीही परवानगी आतापर्यंत नव्हती. परंतु, त्याची रीतसर परवानगी घेऊन शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला व त्याला यशही मिळाले. ही तलवार मिळविण्यासाठी "भारतीय मैत्री'ही महत्त्वाची आहे. इंग्लंडच्या हाउस ऑफ पार्लमेंटचे १० भारतीय खासदार यासाठी मदत करणार असल्याचेही श्री. गमरे यांनी सांगितले. ही तलवार भारतात आणण्यासाठी मोठी मागणी होण्याची गरज असून, तेव्हाच ही तलवार भारताला मिळू शकेल, असा विश्‍वास श्री. गमरे यांनी व्यक्त केला।

सैकड़ों लोगों ने 'शिवधर्म' अपनाया

सोमवार, 14 जनवरी 2008( 10:30 IST )
महिलाओं समेत सैकड़ों लोगों ने महाराष्ट्र में तीन वर्ष पहले बने नए धार्मिक समुदाय 'शिवधर्म' स्वीकार कर लिया है।यह धर्मांतरण मराठा योद्धा छत्रपति शिवाजी की माता जीजाबाई की 410वीं जयंती के अवसर पर हुआ, जो शिवधर्म की कुलदेवी हैं। यह धर्म कुछ हिन्दू परंपराओं को अस्वीकार करता है।धर्मांतरण बीती शाम अकोला के पड़ोसी जिले बुलढाणा के शिंदखेड़ राजा में हुआ। शिवधर्म के संस्थापक पुरूषोत्तम खेड़कर ने इस अवसर पर एकत्रित लोगों को संबोधित किया।नए धर्म की शपथ लेने वालों में मराठी दैनिक 'देशोन्नति' के प्रधान संपादक प्रकाश पोहरे भी शामिल हैं।


""मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास "मराठा विरुद्ध दलित' हा संघर्ष कमी होऊन नवनिर्मितीच्या दिशेने समाजाची वाटचाल सुरू होईल,'' असे मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांनी आज येथे सांगितले. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लढा करून यश संपादन करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या प्रांगणात उभारलेल्या शाहूनगरीत मराठा सेवा संघाच्या बाराव्या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला वीर बाजी पासलकर यांचे वंशज ज्ञानोबा पासलकर, कान्होजी जेधे यांचे वंशज युवराज, हिरोजी भोसले यांचे वंशज सचिन व राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षिका राजश्री भोसले यांचा सत्कार संत तुकाराम महाराजांची प्रतिमा व मानपत्र देऊन करण्यात आला. संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, तमिळनाडूतील तंजावर येथील सरदार घराण्यातील प्रभावती गाडे रावसाहेब काकू, लेखिका कुमुदिनी पवार, ग्रामीण पोलिस अधीक्षक विश्žवास नांगरे पाटील, कर्नाटकचे राजाराम गायकवाड, जपानच्या टोकियो शहरातील व्यावसायिक बाळासाहेब देशमुख, "संभाजी ब्रिगेड'चे अनंत चोंदे, जयश्री शेळके, सारिका भोसले, आमदार शरद ढमाले तसेच दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, राजेंद्र कोंढरे, पांडुरंग बलकवडे, अभिनेते अशोक समर्थ उपस्थित होते. गोरे म्हणाले, ""मराठा सेवा संघाने हाती घेतलेल्या समाज जागृतीमुळे मराठा-मराठेतर संघर्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होत आहेत. अंधश्रद्धा, रूढी-परंपरेतून समाज मुक्त होत आहे. मात्र, आम्ही अजूनही अस्वस्थ आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यास तरुणांना प्रोत्साहन देत असलो तरी बेरोजगारीचा प्रश्žन मोठा आहे. मराठा समाजासाठी सहा महिन्यांत आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यानुसार आरक्षण लागू करावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्याची मोहीम राबविण्यात येईल.'' मराठा सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेताना ते म्हणाले, ""मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले तरी त्यांचा इतिहास धार्मिक बंधनात अडकला. त्यामुळे मराठ्यांचे कर्तृत्व पुढे आले नाही. इतिहास लेखनातील हा अन्याय व कलंक पुसून सत्य इतिहास मांडण्याचे काम सेवा संघ करत आहे. धार्मिक गुलामगिरी, वैदिक धर्माच्या बेड्यांतून बहुजन समजाला मुक्त करून शिवधर्माचा स्वीकार करून त्यांना चैतन्यदायी मार्गावर नेत आहोत. येत्या ता. १२ जानेवारीला हजारो जण शिवधर्माची दीक्षा घेणार आहेत. भटजींना न बोलविता होणारे विवाह; तसेच सण, उत्सवावरचा खर्च वाचवून शिक्षण व उद्योगधंद्यासाठी हा पैसा वापरण्यास झालेली सुरवात हे संघाच्या कामाचे यश आहे. जगभरातील मराठा समाजातील व्यक्तींपर्यंत हे कार्य पोचविण्याचे काम सुरू आहे. विकृत इतिहासाला जबाब देण्याचे काम "संभाजी ब्रिगेड' करत आहे.'' राजाराम गायकवाड म्हणाले, ""शहाण्णव, ब्याण्णव कुळी असा भेदभाव करणे समाजासाठी घातक आहे. मराठा सेवा संघामुळे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर येत असून, त्यानुसार कर्नाटकातील मराठी समाजाने बदल करण्यास सुरवात केली आहे.'' प्रास्ताविक भाषणात विजयकुमार ठुबे म्हणाले, ""मराठा समाजाने एकत्र येऊन स्वत:चा विकास करणे काळाची गरज आहे. मराठा सेवा संघ परिवर्तनवादी चळवळ झालेली आहे.'' लाल महाल येथील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवून तेथे शहाजी महाराजांचा पुतळा उभारावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. श्रीमंत कोकाटे व जयश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. दोन दिवसांच्या अधिवेशनाला राज्यभरातून महिला व कार्यकर्ते आले आहेत. "शिवसृष्टी' येत्या वर्षभरात ""पुण्यात येत्या वर्षभरात शिवसृष्टी उभारण्यात येईल,'' असे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बापू पठारे यांनी सांगितले. दीपक मानकर यांनी ही मागणी केली होती. "पालिकेतर्फे यासाठी जागा देण्यात येईल; तसेच पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल,' असेही पठारे यांनी सांगितले.