१९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा २०११

Wednesday, December 30, 2009

Donate money for jijau srishti

जिजाऊसृष्टीसाठी सढळ हाताने मदत करा..

१२ जानेवारीला जिजाऊ सृष्टीवर येताना कृपया फुल न फुलाची पाकळी या हेतूने आर्थिक मदत करा.जिजाऊ सृष्टीला आंतरराष्ट्रीय स्मारक बनवा...
अधिक माहितीसाठी...

Monday, December 28, 2009

शिवधर्म दीक्षा सोहळा आणि जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी सुरु... महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या देशाचे प्रेरणास्थान असलेल्या मा जिजाऊ ह्यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन दर वर्षी सिंदखेड राजा येथे करण्यात येते,लाखोंच्या संख्येने मातृतीर्थ जिजाऊसृष्टी तसेच शिवधर्म पीठ फुलून जाते.. शिवधर्म दीक्षेसाठी देश विदेशातून बहुजन बांधव येथे गर्दी करतात...या वर्षीही हा जोश कायम असल्याचे दिसून येत आहे..महाराष्ट्रभर विविध परिवर्तनवादी संघटनांकडून व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात येत आहे, ३ जानेवारी पासून सावित्री- जिजाऊ दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते, त्या निमित्तानेहि तयारी सुरु झाली आहे..तमाम बहुजनांना आता वेध लागले आहेत ते जिजाऊ जन्मोत्सवाचे ..भेटूया....सिंदखेड राजा जि.बुलढाणा येथे...जय जिजाऊ ...!!

Tuesday, November 24, 2009



Monday, January 12, 2009

जिजाऊ जन्मोत्सवाला लाखोंची उपस्थिति












दुर्लक्षित जिजाऊ जन्मस्थळ प्रसंगी स्वखर्चातून विकास करू

नागपूर, ता. १२ - "जन्मस्थळी राष्ट्रमाता जिजाऊ कुलूपबंद' या मथळ्याखाली "सकाळ'ने जिजाऊ जन्मस्थळावर प्रकाशझोत टाकला. जन्मोत्सव सोहळ्यात उपस्थित विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रसंगी स्वखर्चातून जिजाऊंच्या स्मारकासाठी प्रयत्न करण्याची तयारी काहींनी दाखविली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या प्रकरणी विकासकामांची वस्तुस्थिती जाणून घेऊन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जिजाऊ जन्मस्थळाकडे शासनाचे गंभीर दुर्लक्ष झाल्याची बाब "सकाळ'ने ठळकपणे समोर आणली. याबद्दल धन्यवाद देतानाच, कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्दी येथील प्रवीण पाटील म्हणतात, ""राष्ट्रमाता जिजाऊंसाठी शासनाजवळ पैशाची कमतरता पडत असेल तर आम्ही आमच्या कमाईतून प्रत्येकी शंभर रुपये गोळा करून तेथील दुरवस्था दूर करू.'' बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आगामी अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले व "सकाळ'ने मांडलेली वस्तुस्थिती मान्य केली. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्‍ते आणि इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनीही जिजाऊंचे जन्मस्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे व त्याची दुरवस्था संपावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेना नेते छगन मेहेत्रे यांनी सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मस्थळाच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकल्याबद्दल आभार मानून निदान आता तरी शासन लक्ष देईल काय, हा प्रश्‍न उपस्थित केला. महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा व प्रतिष्ठेचा वारसा जोपासण्यासाठी पैशाचे कारण पुढे न करता शासनाने सढळ हस्ते मदत केली पाहिजे. एकीकडे शिवरायांच्या नावाने राजकारण करीत असताना जिजाऊंच्या स्मारकासाठी निधी न देणे ही दुटप्पी भूमिका आता तरी शासनाने सोडून द्यावी, अशी रोखठोक प्रतिक्रिया बुलडाण्याचे आमदार विजयराज शिंदे यांनी व्यक्त केली






Sunday, January 11, 2009

आज सिंदखेडनगरीत जिजाऊ जन्मोत्सव !!!




चलो सिंदखेडराजा

जय जिजाऊ ...जय शिवरायचा उद्घोष करत सिंदखेडराजा नगरीत लाखो जिजाऊ प्रेमी दाखल...

"राजमाता जिजाऊंचे स्मरण करून विषमतावादी धर्माचे संस्कार नाकारून समतावादी शिवधर्माचा आम्ही स्वीकार करीत आहोत...."

असी शपथ घ्या...

Friday, January 9, 2009

जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
औरंगाबाद, ता. ९ - सिंदखेडराजा येथे सोमवारी (ता.१२) जिजाऊ जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवधर्म स्वीकारण्यासाठी शिवभक्त येणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे विंग कमांडर टी. आर. जाधव यांनी सांगितली. या महोत्सवाच्या निमित्ताने मराठा सेवा संघाच्या बाबा पेट्रोल पंप येथील राजर्षी शाहू भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी दादाराव कुबेर, मदन पिसे उपस्थित होते. या वेळी बोलताना श्री. जाधव म्हणाले,"" सिंदखेडराजा येथे गेल्या १५ वर्षांपासून जिजाऊ जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. राजवाड्यासमोर हा कार्यक्रम होत असे, पण त्या ठिकाणची जागा अपुरी पडत असल्याने मराठा सेवा संघाने दीडशे एकरात "जिजाऊ सृष्टी' निर्माण करण्याचा महत्त्वाकांशी प्रकल्प हाती घेतला आहे. मोती तलावाच्या शेजारी या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. अकरा हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्या ठिकाणी दहा हजार श्रोते बसतील, असा मंडप तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अतिथीगृहही उभारणीचे काम सुरू आहे. हा प्रबोधनात्मक कार्यक्रम असून त्या ठिकाणी सर्व समाजाच्या नागरिकांना प्रवेश आहे. ते येऊन शिवधर्म स्वीकारू शकतात. या निमित्ताने शिवधर्म पद्धतीने शंभर दांपत्यांचे सामूहिक विवाह तिथे लावण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे काम औरंगाबाद येथील डॉ. दिलीप देशमुख पाहात आहेत. या वेळी पुरुषोत्तम खेडेकर, नेताजीराव गोरे, अनंत चोंदे, जयश्री शेळके, प्रवीण गायकवाड, मा. म. देशमुख हे उपस्थितांचे प्रबोधन करणार आहेत, तर सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनपर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.''
भाविकांसाठी प्रवेशद्वाराचे आकर्षण
जिजाऊ सृष्टीच्या भव्य प्रवेशद्वाराचे काम येत्या सोमवारपर्यंत पूर्ण होणार आहे. हे प्रवेशद्वार दिल्लीतील अक्षरधाम मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या धरतीवर उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी असणारा राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा हे भाविकांसाठीचे खास आकर्षण असणार आहे, असे श्री. जाधव यांनी सांगितले.






Saturday, January 3, 2009