नळीच्या आधारे पोपट पंख विसरला संत तुकोबारायांचे एक अत्यंत मार्मिक वचन आहे...
शुके नळीकेंसी,गोवियली पाय विसरोनी जाय,पक्ष दोन्ही.
पोपटानं आपले दोन्ही पाय आधाराच्या नळीमध्ये गुंतवून ठेवले आणि तो दोन्ही पंखाना विसरून गेला. ज्यांचं मन हिंदुत्वात गुंतलेलं आहे,त्यांची अवस्था तुकारामांनी वर्णीलेल्या पोपटासारखी झाली आहे,हां पोपट एक नळी वर आपले दोन्ही पाय टेकवून बसला आहे ती नळी हा आपला मोठा आधार आहे,असं त्याला वाटतय,आपल्या पायाखालची नळी जर कुणी काढून घेतली तर आपण पडू अशी भीती त्याच्या मनात आहे,स्वाभाविकच कुणीही त्याच्या पायाचा आधार तर नाहीच,उलट त्याच्या पायांना गुंतवून ठेवणारी बेडी आहे अत्यंत क्लेशदायक बाब ही आहे की तो या बेडिलाच आपलं सर्वस्व मानु लागला आहे,वस्तुतः त्याला दोन पंख आहेत,त्यामुळे त्याच्या पायांखालची नळी कुणी काढून घेतली तरी तो कोसळणार नाही,आपल्या पंखांच्या जोरावर तो आकाशात भरारी मारू शकेल.
1 comment:
jai jijau
Post a Comment