१९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा २०११

Thursday, January 6, 2011

जिजाऊ जन्मोत्सव आणि शिवधर्म प्रकटनाचा ६ वा वर्धापन दिन १२ जानेवारी २०११

जिजाऊ जन्मोत्सव आणि शिवधर्म प्रकटनाचा वा वर्धापन दिन १२ जानेवारी २०११

जय जिजा..


दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमाचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे..ह्या वर्षी मराठा विश्वभूषण आणि जिजाऊ पुरस्कार हे शिवधर्मपीठावरून दिले जाणार आहेत..जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.. ३ जानेवारी पासूनच सावित्री-जिजाऊ जन्मोत्सवास सुरवात झाली असून जिजाऊ सृष्टीवर उत्साहाचे वातावरण दिसत आहे..ह्या वर्षी डी वाय पाटील ह्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत..ह्या साठी देशभरातून शिवधर्मी आणि जिजाऊप्रेमी उपस्थित राहणार आहेत.. गेल्या वर्षी शिवधर्म मृत्योत्तर संस्कारांचे प्रकाशन शिवधर्म साहित्य निर्मिती गण आणि विश्व शिवधर्म संसदेच्या वतीने करण्यात आले होते...ह्या वर्षी शिवधर्मसाहित्यात कोणती भर पडणार ह्याबद्दल शिवधर्मियात उत्सुकता आहे..


जिजाऊ सृष्टीवर राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव



मराठा विश्वभूषण पुरस्कार जाहीर

यंदाही १२ जानेवारीला जिजाऊ सृष्टीवर मराठी सेवा संघातर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांचा ४१३ वा जन्मोत्सव सोहोळा मोठय़ा प्रमाणात साजरा होणार आहे.
या सोहोळ्यात यंदाचा मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा मराठा विश्वभूषण पुरस्कार पंढरपूर येथील बद्रीनाथ महाराज तनपुरे, शिव राज महाराज जाधव व शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील या तिघांना तर जिजाऊ पुरस्कार कळमनुरीच्या शाहीर अनसूयाबाई शिंदे व बडोद्याच्या जादूगर मेरीगोल्ड मंदाकिनी जाधव यांना दिला जाणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अमरावती विभागीय अध्यक्ष राजेंद्र आढाव यांनी दिली.
या सोहोळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केरळचे राज्यपाल रा.सू. गवई. त्रिपुराचे राज्यपाल डॉ.डी.वाय. पाटील. शिवराज पाटील, चाकुरकर यांच्यासह मराठा सेवा संघाचे सर्व कक्षांचे अध्यक्ष शिवधर्माचे धर्मसंसद व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहणार आहे. यंदाच्या ४१३ व्या जन्मोत्सव सोहोळ्याच्या नियोजनार्थ नुकतीच जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी मंडळाची बैठक झाली. यात मराठी विश्वभूषण व जिजाऊ पुरस्कारांबद्दल निर्णय झाला.
या बैठकीसाठी सेवा संघाचे नेताजी गोरे, संतोष गाजरे, भरत मानकर, बिग्रेडीयर सुधीर सावंत, सृष्टीचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव देशमुख, शीतल तनपुरे, चंद्रशेखर शिखरे तहसीलदार सुनील शेळके, राजेंद्र आढाव, अण्णासाहेब बुरकूल, प्रशांत खाचणे, सुभाषराव कोल्हे, संजय विरवे, मनोज आखरे, नंदू गावंडे, पप्पू पाटील, भोयर, देवानंद कापसे, विजयकुमार दुबे, विलास पाटील व विनोद पऱ्हाड आदी उपस्थित होते. यात जन्मोत्सव तयारीचे नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. तर सालाबादा प्रमाणे यंदाही जिजाऊ सृष्टीवर ३ जानेवारीपासून जन्मोत्सव सोहोळा मोठय़ा प्रमाणात प्रारंभ होणार आहे.

No comments: