Showing posts with label jijau janmotsav 2011. Show all posts
Showing posts with label jijau janmotsav 2011. Show all posts
Friday, January 13, 2012
Sunday, January 16, 2011
जिजाऊ जन्मोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा....
यावेळी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर, उपाध्यक्ष राम जाधव, पंचायत समिती सभापती शीला शिंगणे, नगर परिषद नगराध्यक्ष बबन म्हस्के, उपाध्यक्ष जगन ठाकरे, जिल्हा परिषद सभापती वैशाली सुपेकर, अभय चव्हाण, प्रभारी मुख्य कार्यपालनाधिकारी संजय कापडणीस यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी हजर होते. यानंतर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधव यांनी केले.
जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून याहीवर्षी मराठा सेवासंघ द्वारा आयोजित शिवविवाह जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म पद्धतीने संपन्न झाला. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेश सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सिंदखेडराजा येथील गजानन प्रल्हाद सवने व संगीता रामकिसन मोहिते, (मांडवा (लोणार) येथील पंढरी रामकिसन मुढ्ढे व गिर्झापूर (वाशीम) येथील नंदा विठ्ठल घायाळ, टाकरखेड वायाळ येथील आनंद प्रल्हाद पवार व तढेगावच्या करुणा नामदेव गवई, वणी येथील दत्ता डोहे व वणीच्या सीमा अस्वले तसेच पुण्याचे संतोष शिंदे व तेर (जि. उस्मानाबाद) येथील शालिनी मासाळे यांचा विवाह या सोहोळ्यात पार पडला.
| आज जिजाऊ जन्मोत्सव, सिंदखेडराजा सज्ज! | | | | |
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊ दशरात्रौत्सव साजरा होत आहे. ३ जानेवारीपासून या सोहोळ्याला सुरुवात झाली असून उद्या १२ जानेवारीला सांगता होणार आहे.
महाराष्ट्रासह देश-विदेशातील पाहुणे मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत पोहोचत आहेत. विविध वैचारिक तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सिंदखेडराजा-जालना मार्गावरील जिजाऊसृष्टी परिसर सज्ज झाला आहे. सुमारे १०० एकराच्या परिसरात भव्य सभामंडप उभारून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, राजवाडा परिसरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. रस्त्यावर स्वागत कमानी उभारून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले जात आहे. शिवभक्तांना वैचारिक खाद्य पुरवण्यासाठी पुस्तकांची दुकाने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच उपाहार गृहाची दुकाने घातली आहे. येणाऱ्या पाहुण्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चौकशी कक्ष, देणगीदारांसाठी देणगी कक्ष उभारण्यात आले आहेत. यामुळे या परिसराला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराव जाधवांचे समाधीस्थळ, रंगमहाल यासह जिजाऊसृष्टीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे या सोहोळ्यावर पॅराग्लायडिंगद्वारे पुष्पवृत्ती केली जाणार आहे.
उद्या १२ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता राजवाडय़ावरील जिजाऊ जन्मस्थळावर मातोश्री जिजाऊंचे पूजन मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखा खेडेकर, नेताजी गोरे, तहसीलदार सुनील शेळके, काँग्रेस नेत्या जयश्री शेळके, विचारवंत डॉ. आ.ह. साळुंके, देवानंद कापसे, राजे शिवाजीराव जाधव, अरविंद गावंडे, पंढरपूरचे बद्रीनाथ महाराज, चनखोरे, कैकाडी महाराज, ‘शंभुराजे’ नाटक फेम सातारा येथील हर्षवर्धन कदम, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या निमित्ताने या ठिकाणी दिवसभर सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. तसेच, मुख्य कार्यक्रमात मराठा विश्व भूषण, जिजाऊ पुरस्काराचे वितरण तसेच, दुपारी २ वाजता शिवधर्मपीठावर नामावंत व्यक्तींचा सत्कार, पुस्तकांचे प्रकाशन व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
| जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन | |
| जिजाऊ जयंतीनिमित्त समितीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश संपादन केलेल्या महिला, राज्यपातळीवर अजिंक्य ठरलेला श्रीपतराव भोसले हायस्कूलचा महिला संघ, छत्रपती हायस्कूलच्या मुलींचा व्हॉलीबॉल संघ, तसेच उस्मानाबाद आकाशवाणीचे निवेदक संजय मैंदर्गी व आनंद वीर, खो-खो असोसिएशनचे राज्य सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव आदींचा सत्कार या कार्यक्रमात होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, प्रमुख अतिथी म्हणून आमदार राणाजगजीतसिंह पाटील, राज्य सहकारी बँकेचे संचालक विश्वास शिंदे, सत्तार शेख, के. टी. पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद पाटील, शिवसेनेचे अनिल खोचरे, रिपाइंचे राजाभाऊ ओहाळ, मनसेचे अनिल मंजुळे हे उपस्थित राहणार आहेत. बुधवारी सकाळी ९.३० वाजता शहरातील जिजाऊ चौक, बार्शी नाका येथे आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिजाऊ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मधुकर अनभुले, डॉ. सुभाष वाघ, श्याम कदम, राहुल सूर्यवंशी आदींनी केले आहे. जवान संघटनेच्या वतीने राजगडाच्या पायथ्याशी जिजाऊ जन्मोत्सव साजरा. . | |
Thursday, January 6, 2011
जिजाऊ जन्मोत्सव आणि शिवधर्म प्रकटनाचा ६ वा वर्धापन दिन १२ जानेवारी २०११
जिजाऊ जन्मोत्सव आणि शिवधर्म प्रकटनाचा ६ वा वर्धापन दिन १२ जानेवारी २०११
जय जिजाऊ..

दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमाचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे..ह्या वर्षी मराठा विश्वभूषण आणि जिजाऊ पुरस्कार हे शिवधर्मपीठावरून दिले जाणार आहेत..जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.. ३ जानेवारी पासूनच सावित्री-जिजाऊ जन्मोत्सवास सुरवात झाली असून जिजाऊ सृष्टीवर उत्साहाचे वातावरण दिसत आहे..ह्या वर्षी डी वाय पाटील ह्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत..ह्या साठी देशभरातून शिवधर्मी आणि जिजाऊप्रेमी उपस्थित राहणार आहेत.. गेल्या वर्षी शिवधर्म मृत्योत्तर संस्कारांचे प्रकाशन शिवधर्म साहित्य निर्मिती गण आणि विश्व शिवधर्म संसदेच्या वतीने करण्यात आले होते...ह्या वर्षी शिवधर्मसाहित्यात कोणती भर पडणार ह्याबद्दल शिवधर्मियात उत्सुकता आहे..
मराठा विश्वभूषण पुरस्कार जाहीर
यंदाही १२ जानेवारीला जिजाऊ सृष्टीवर मराठी सेवा संघातर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांचा ४१३ वा जन्मोत्सव सोहोळा मोठय़ा प्रमाणात साजरा होणार आहे.
या सोहोळ्यात यंदाचा मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा मराठा विश्वभूषण पुरस्कार पंढरपूर येथील बद्रीनाथ महाराज तनपुरे, शिव राज महाराज जाधव व शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील या तिघांना तर जिजाऊ पुरस्कार कळमनुरीच्या शाहीर अनसूयाबाई शिंदे व बडोद्याच्या जादूगर मेरीगोल्ड मंदाकिनी जाधव यांना दिला जाणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अमरावती विभागीय अध्यक्ष राजेंद्र आढाव यांनी दिली.
या सोहोळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केरळचे राज्यपाल रा.सू. गवई. त्रिपुराचे राज्यपाल डॉ.डी.वाय. पाटील. शिवराज पाटील, चाकुरकर यांच्यासह मराठा सेवा संघाचे सर्व कक्षांचे अध्यक्ष शिवधर्माचे धर्मसंसद व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहणार आहे. यंदाच्या ४१३ व्या जन्मोत्सव सोहोळ्याच्या नियोजनार्थ नुकतीच जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी मंडळाची बैठक झाली. यात मराठी विश्वभूषण व जिजाऊ पुरस्कारांबद्दल निर्णय झाला.
या बैठकीसाठी सेवा संघाचे नेताजी गोरे, संतोष गाजरे, भरत मानकर, बिग्रेडीयर सुधीर सावंत, सृष्टीचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव देशमुख, शीतल तनपुरे, चंद्रशेखर शिखरे तहसीलदार सुनील शेळके, राजेंद्र आढाव, अण्णासाहेब बुरकूल, प्रशांत खाचणे, सुभाषराव कोल्हे, संजय विरवे, मनोज आखरे, नंदू गावंडे, पप्पू पाटील, भोयर, देवानंद कापसे, विजयकुमार दुबे, विलास पाटील व विनोद पऱ्हाड आदी उपस्थित होते. यात जन्मोत्सव तयारीचे नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. तर सालाबादा प्रमाणे यंदाही जिजाऊ सृष्टीवर ३ जानेवारीपासून जन्मोत्सव सोहोळा मोठय़ा प्रमाणात प्रारंभ होणार आहे.

| जिजाऊ सृष्टीवर राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव | | | |

Subscribe to:
Posts (Atom)