१९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा २०११

Friday, August 31, 2012

मराठा सेवा संघाचा आज वर्धापन दिन..... हार्दिक शिवेच्छा...

मराठा सेवा संघाचा आज वर्धापन दिन..... हार्दिक शिवेच्छा...

Sunday, February 19, 2012

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...

तमाम शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...

जय जिजाऊ..दर वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही शिवधर्म सेवा मंडळ..आपल्यासाठी विशेष काहीतरी घेवून येत आहे...ह्या वर्षी जगभरातील शिवजयंतीची इत्यंभूत माहिती देणारा एक मराठी ब्लौग आपल्या सेवेत सादर करत आहोत...



धन्यवाद...जय जिजाऊ..जय शहाजीराजे..जय शिवराय..!!!

Friday, January 13, 2012

शिवधर्माची संपूर्ण संहिता २०१४ मध्ये पूर्ण होणार - आ ह साळुंखे ह्यांची घोषणा

शिवधर्माची संपूर्ण संहिता २०१४ मध्ये पूर्ण होणार - आ ह साळुंखे ह्यांची घोषणा

बातमी वाचण्यासाठी डबल क्लिक करा..



Blog प्रकाशक- शिवधर्म सेवा मंडळ

जिजाऊ जन्मोत्सव - १२ जानेवारी २०१२

आज मातृतीर्थावर जिजाऊ जन्मोत्सव; देश-विदेशातून जिजाऊ भक्तांचे लोंढे

१२ जानेवारी २०१२ ,प्रतिनिधी , बुलढाणा
यंदाही येथील जिजाऊ सृष्टी प्रकल्पावर मराठा सेवा संघाच्यावतीने सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सोहळ्याची सांगता मॉं साहेबाच्या ४१४ व्या जन्मोत्सव सोहळ्याने मोठय़ा थाटामाटात होणार आहे. यासाठी मातृतीर्थ नगरी व जिजाऊ सृष्टी नववधुप्रमाणे नटली असून जिजाऊ भक्तांचे लोंढेच्या लोंढे संपूर्ण देशासह परदेशातून मातृतीर्थावर दाखल होत आहेत. ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सुरू झाला होता.
यानिमित्ताने सृष्टीवरील कार्यक्रमाची सर्वतोपरी तयारी अंतिम टप्यात असून जिजाऊ भक्त मराठा सेवा संघाच्या सर्वच्या सर्व ३१ कक्षाचे श्रेष्ठ-ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते अखंड परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यासाठी जिजाऊ सृष्टीच्या सुमारे १०० एकराच्या प्रदीर्घ मैदानावर भव्य सभामंडप, स्वागतकक्ष, रोशणाई, स्वागत कमानी, नियंत्रण कक्ष, देणगी कक्ष, स्टॉल नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहन पार्किंग व्यवस्था, खान-पान व पुस्तकांचे स्टॉल आदी व्यवस्था सज्ज करण्यात आल्या आहेत.
जिजाऊ सृष्टी परिसराला व जिजाऊ नगरीला या निमित्ताने यात्रेचे स्वरूप आले असून जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराव जाधव समाधी स्थळ, राजवाडा रंगमहल यासह संपूर्ण सृष्टीवर भव्य प्रमाणात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पॅरामोटारमधून पुष्पवृष्टी
दरवर्षीप्रमाणे यंदाही सृष्टीवर व जिजाऊ भक्तांवर पॅरामोटारमधून पायलट भगवानराव जाधव पुष्पवृष्टी करणार आहेत. १२ जानेवारीला सकाळी ६ वाजता राजवाडय़ातील जिजाऊ जन्मस्थळावर विविध मान्यवर जोडप्यांच्या हस्ते जिजाऊंचे पूजन, त्यानंतर सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान जिजाऊ सृष्टीवर विविध वैचारिक, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून ते ज्येष्ठ विचारवंत मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ आधारवड डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते उत्तररात्रीपर्यंत शिवधर्मपीठावर सेवा संघाच्या ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा संपन्न होणार आहे.
जिजाऊ पुरस्कार
यावेळी याच विचारपीठांवर ‘वीर शिवाजी’ कलर चॅनल्सवरील लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्या शिवमती रूपाली अभिमन्युसिंह यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. आ.ह. साळुखे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार शिवमती रेखाताई खेडेकर, नेताजीराव गोरे, देवानंद कापसे, चंद्रशेखर शिखरेंसह सेवा संघाच्या ३१ कक्षाचे राज्याध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यासाठी गेल्या महिनाभरापासून जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव देशमुख, डॉ. अरविंद गावंडे, शिवाजीराजे जाधव, चंद्रशेखर शिखरे, सुभाषराव कोल्हे, तहसीलदार सुनील शेळके, राजेंद्र अढाव, अण्णासाहेब बुरकुल, समाधान शिंदे, कृष्णा कुहिरे, गिरीश वाघमारे, संजय विखे, किशोर खेडेकर, संजय उनगे, राममूर्ती वालसिंगे, उमेश इंगळे, शिवाजी गव्हाड, दाळु पाटील आदी जिजाऊ भक्त परिश्रम घेत आहेत.

आज जिजाऊ जन्मोत्सव, सिंदखेडराजा सज्ज !!!

सिंदखेडराजा, ११ जानेवारी/ वार्ताहर
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊ दशरात्रौत्सव साजरा होत आहे. ३ जानेवारीपासून या सोहोळ्याला सुरुवात झाली असून उद्या १२ जानेवारीला सांगता होणार आहे.
महाराष्ट्रासह देश-विदेशातील पाहुणे मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत पोहोचत आहेत. विविध वैचारिक तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सिंदखेडराजा-जालना मार्गावरील जिजाऊसृष्टी परिसर सज्ज झाला आहे. सुमारे १०० एकराच्या परिसरात भव्य सभामंडप उभारून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, राजवाडा परिसरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. रस्त्यावर स्वागत कमानी उभारून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले जात आहे. शिवभक्तांना वैचारिक खाद्य पुरवण्यासाठी पुस्तकांची दुकाने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच उपाहार गृहाची दुकाने घातली आहे. येणाऱ्या पाहुण्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चौकशी कक्ष, देणगीदारांसाठी देणगी कक्ष उभारण्यात आले आहेत. यामुळे या परिसराला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराव जाधवांचे समाधीस्थळ, रंगमहाल यासह जिजाऊसृष्टीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे या सोहोळ्यावर पॅराग्लायडिंगद्वारे पुष्पवृत्ती केली जाणार आहे.
उद्या १२ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता राजवाडय़ावरील जिजाऊ जन्मस्थळावर मातोश्री जिजाऊंचे पूजन मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखा खेडेकर, नेताजी गोरे, तहसीलदार सुनील शेळके, काँग्रेस नेत्या जयश्री शेळके, विचारवंत डॉ. आ.ह. साळुंके, देवानंद कापसे, राजे शिवाजीराव जाधव, अरविंद गावंडे, पंढरपूरचे बद्रीनाथ महाराज, चनखोरे, कैकाडी महाराज, ‘शंभुराजे’ नाटक फेम सातारा येथील हर्षवर्धन कदम, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या निमित्ताने या ठिकाणी दिवसभर सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. तसेच, मुख्य कार्यक्रमात मराठा विश्व भूषण, जिजाऊ पुरस्काराचे वितरण तसेच, दुपारी २ वाजता शिवधर्मपीठावर नामावंत व्यक्तींचा सत्कार, पुस्तकांचे प्रकाशन व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Friday, February 18, 2011

३८१ व्या शिवजयंतीच्या हार्दिक शिवेच्छा..

शिवजयंती निम्मित प्रकाशित करतोय..सुप्रसीद्ध चित्रकार मिलिंद विचारे ह्यांच्या कुंचल्यातून साकारलेली शिवचरित्रचित्रे ...संकल्पना- प्रतीइतिहासकार चंद्रशेखर शिखरे,प्रकाशक - शिवधर्म सेवा मंडळ.

रायगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज


शिवराज्याभिषेक मिरवणूक



भोसलेभूमी वेरूळ शिव-शिवदर्शन.. वेरूळची लेणी पाहताना शिवाजी महाराज...

लाख मेले तरी चालतील,पोशिंदा मात्र जगला पाहिजे..आधुनिक बळीराजा- शिवराय


रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा
श्रीमंत कोकाटे
Saturday, February 19, 2011 AT 01:00 AM (IST)

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांची संवेदनशीलता, प्रेम, शिस्त असे अनेक गुण दिसतात. त्याविषयी शिवजयंतीनिमित्त (ता. १९) एक दृष्टिक्षेप.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या निर्दालनासाठी हाती तलवार घेतली. हा लढायांचा इतिहास तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. ढाल-तलवारीच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजीराजांनी रयतेबद्दल व्यक्त केलेल्या भावना, प्रजेच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी घेतलेले निर्णय, काळजी, कळवळा त्यांच्या पत्राद्वारे आपणास प्रकर्षाने जाणवते. छत्रपती शिवाजीराजांनी रयतेवर केलेले जिवापाड प्रेम त्यांच्या विविध पत्रांवरून आपणास समजते.

२३ ऑक्‍टोबर १६६२ रोजी शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. शाहिस्तेखानाचे संकट स्वराज्यावर येत आहे. त्याप्रसंगी रयतेची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे महाराजांनी सांगितलेले आहे. ""मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणौन जासुदानी समाचार आणिला आहे. तरी तुम्हास रोखा अहडताच तुम्ही तमाम आपलेतपियात गावचा गाव ताकिदी करून माणसे, लेकरेबाळे समतर तमाम रयेति लोकास घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठविणे. ये कामात हैगै न करणे ..... गावचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाली जागा असेल तेथे पाठवणे. या कामास एक घडीचा दिरंग न करणे.'' रयतेच्या रक्षणासाठी एक क्षणाचाही विलंब करू नका, अशा सूचना शिवरायांनी प्रस्तुत पत्रात सर्जेराव जेधे यांना दिलेल्या आहेत.

१९ मे १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग "".......... पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंढी करून चाराल.

नाहीसें जालें म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील कोण्ही कुणब्याचे थील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत, तेहि जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल, की मोगल मुलकांत आले त्याहुनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल! ....... रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. ........ कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही. ........ हाली उनाळ्याला आहे ........ कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील .......... आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. ........'' शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये.
शेतकऱ्यांच्या काडीलादेखील हात लावू नये; अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.

शिवरायांनी शेतकरी कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम केले. २ सप्टेंबर १६६० रोजी शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. कान्होजी जेधे आजारी असल्याची माहिती मिळाल्यामुळे महाराज त्यांना लिहितात, ""औसध घेऊन शरीरासी आरोग्य होई ते करणे. उपचाराचे विशी आलस न करणे... औषधोपचार घेऊन बरे होणे. त्याबाबत हयगय करू नये,'' असा अत्यंत मायेचा सल्ला शिवरायांनी कान्होजी जेधेंना दिलेला आहे.

शिवाजी महाराजांची अनेक पत्रं आहेत. त्यातून शिवरायांची संवेदनशीलता, प्रेमळपणा, वक्तशीरपणा, शिस्त, व्यवस्थापन, धर्मनिरपेक्षता, नैतिकता, प्रशासनव्यवस्था याची माहिती मिळते. शिवाजी महाराजांच्या पत्रावरून लक्षात येते की, शिवरायांचे स्वराज्य हे रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते. Thanks-e-sakal.com






Wednesday, February 9, 2011

Monday, February 7, 2011

स्वराज्यसंकल्पक शाहजीराजे भोसले आणि स्वराज्यप्रेरणा जिजाऊसाहेब




Swarajyaprerana Rashtramata Jijausaheb & Swarajyasankalpak Rashtrapita Shahjiraje Bhosale...


We are thankful to Artist Mr.Milind Shimpi, Mr.Milind Wichare (jijau,shahjiraje paintings resp.) Also..Famous Novelist Mr.Madan Patil,Historian Chandrashekhar Shikhre

- Shivdharam Seva Mandal

Sunday, February 6, 2011

Sunday, January 16, 2011

जिजाऊ जन्मोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा....

राजधानी दिल्लीत जिजाऊ जन्मोत्सव साजरा..
राजधानी दिल्लीत महारष्ट्र भवनात १२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..ह्या वेळी राजकीय मंडळी,सरकारी अधिकारी तसेच सचिवांची उपस्थिती होती... मराठा सेवा संघ दिल्लीच्या वतीनेही जिजाऊ जन्मोत्साव्चे आयोजन कमलेश पाटील ह्यांनी केले होते...

हरयाणा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा..
हरयाणा राज्यातील पानिपत येथे मोठ्या संख्येने मराठी लोक राहतात,काल आम मैदानात १२ जानेवारी रोजी मराठा जागृतीमंच च्यावतीने जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.. ह्या वेळी हजारो रोड मराठ्यांनी गर्दी केली होती..जय जिजाऊ..जय शिवराय च्या घोषात हा कार्यक्रम संपन्न झाला..ह्या वेळी मराठा वीरेंद्र वर्मा ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.. तसेच १४ जानेवारीला पानिपत येथील काला आम येथे मराठा शौर्य दिनाचे आयोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .ह्या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आणि मुख्यमंत्री हुड्डा ह्यांची प्रमुख उपस्थिती होती...ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून संभाजी ब्रिगेड तसेच शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते .

पुण्यात हजारोंच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा

ह्या वर्षी पुण्यातही लाल महाल आणि शनिवारवाडा येथे जिजाऊ जन्मोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले होते..शिवप्रेमी जनजागरण समिती आणि लोकशासन आंदोलन च्या वतीने ह्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.. सिंदखेड पाठोपाठ सर्वाधिक गर्दी ह्या कार्यक्रमाला होती..महानगरपालिका भवन येथून भव्य मिरवणूक निघून लाल महाल येथे जीजौंचे दर्शन घेतल्यावर शनिवारवाडा येथे भव्य सभा झाली..ह्या कार्यक्रमामुळे शिवाजी महाराज रोड गर्दीने फुलून गेला होता..ह्या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील,पी.बी.सावंत,बाबा आढाव,प्रतिमा परदेशी ह्यांची प्रमुख उपस्थिती होती..

शिवधर्मपीठावर राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा




सिंदखेडराजा, १३ जानेवारी
छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या ४१२ व्या जन्मोत्सवाची सांगता काल सिंदखेडराजा-जालना मार्गावरील शिवधर्मपीठाच्या पटांगणावरील मातृतीर्थ जिजाऊ सृष्टी परिसरात देश-विदेशातून आलेल्या सुमारे २० हजारांच्या जनसागराच्या उपस्थितीत करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त यासाठी आलेले होते. तत्पूर्वी, सकाळच्या सुमारास राजवाडय़ात राजमाता जिजाऊंचे पूजन करण्यात आले. सुमारे चार एकराच्या परिसरात हा जन्मोत्सव सोहोळा ३ जानेवारीपासून सुरू झालेला होता. काल सकाळी जिजाऊ पूजनानंतर शिवविवाह सोहोळ्यासह अन्य कार्यक्रम साजरे झाले.
काल दुपारी ३ वाजता झालेल्या सांगता समारंभाला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, नेताजी गोरे, संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, माजी आमदार रेखा खेडेकर, देवानंद कापसे, विजया कोकाटे, ऑस्ट्रेलियाहून आलेले प्रशांत राळे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, असे नामकरण करण्यासाठी राज्यात युतीचे सरकार असताना बाळासाहेब ठाकरे यांनीच विरोध केला होता. युती सरकार सत्तेत असताना औरंगाबाद महानगरपालिकेने औरंगाबादचे संभाजीनगर, असे नामकरण करण्याचा ठराव मांडला होता. तसाच ठराव तत्कालीन युती सरकारनेही मंजूर केला होता, परंतु तत्कालीन कायदामंत्री अ‍ॅड. लिलाधर डाके यांना राज्य सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी एका वकिलाची नेमणूक करायची होती. ते टाळण्याचा सल्ला बाळासाहेब ठाकरे यांनी लिलाधर डाके यांना दिला होता. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र शासनाची भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी वकील नव्हता. सलग तीन तारखांना शासनाची भूमिका सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली गेली नाही. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारला औरंगाबादचे संभाजीनगर, असे नामकरण करण्यास स्वारस्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाला वाटले, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद हेच नाव कायम ठेवले.
शिवसेनेने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे मुस्लिमांचे विरोधक आहेत, असा प्रचार केला. मात्र, मराठा महासंघाची मुस्लिमांसोबतची भूमिका सामंजस्याची आहे. शिवसेनेने जर त्यांची भूमिका सोडली तर संभीजानगर, असे नामकरण करण्यास मराठा महासंघाचा आक्षेप राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रारंभी संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संभाजी बिग्रेडच्या दिडशे कार्यकर्त्यांनी परेड केली. त्यानंतर शिवधर्माचे ध्वजारोहण प्रवीण गायकवाड, माजी आमदार रेखा खेडेकर, देवानंद कापसे, विजया कोकाटे, ऑस्ट्रेलियाहून आलेले प्रशांत राळे यांनी ध्वजारोहण तसेच, जिजाऊ ध्यानमंदिराचे भूमिपूजनही केले. त्यानंतर सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाला.
ध्वजारोहणानंतर प्रवीण गायकवाड म्हणाले, पुण्यातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला, त्यामुळे एक इतिहास निर्माण झाला आहे. आज मराठा सेवासंघ एक वीस वर्षांंचा तर, संभाजी ब्रिगेड चौदा वर्षांची झाली आहे. दोघेही तरुण आहेत आणि इतिहास तारुण्यातच निर्माण होत असतात. पुतळा काढल्यानंतर पुण्यात भाजप-सेना रस्त्यावर उतरली. त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या प्रेमापोटी पुणे महानगरपालिकेचे शिवाजी सभागृह फोडले. शिवसेना स्वत: कुठलाच कार्यक्रम ठरवत नाही. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावरच चालावे लागते, असे या प्रकरणावरून दिसून येते. शिवसैनिकांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य जरूर वाचावे, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच, ठाणे जिल्ह्य़ातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचे व सांगलीच्या एका बँके तील शिवरायांसोबत दादोजी कोंडदेव असलेले छायाचित्र हटवण्यासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी रान उठवावे. यासोबतच बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिव छत्रपती व लालमहल या पुस्तकावर राज्य सरकारने बंदी घालावी. रायगडावर शिवरायांच्या समाधीजवळ तेवढय़ाच उंचीची वाघ्या कुत्र्याची समाधी लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली. ती पाडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी पंढरपूर येथील बद्रीनाथ महाराजांना पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते मराठा भिष्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मानपत्राचे वाचन डॉ. स्मिता देशमुख यांनी केले. यावेळी पप्पू भोयर, डॉ. दिलीप देशमुख, श्रीमंत कोकाटे, ब्रिग्रेडिअर सुधीर सावंत, जिजाऊ ब्रिगेडच्या सीमा ढवळे, नेताजी गोरे, ओरिसातून आलेले बंसीधर नायक, तसेच पंढरपुरे तनपुरे महाराज यांची भाषणे झाली. या जिजाऊ जन्मोत्सव सोहोळ्याचे संचालन डॉ. सीमा देशमुख तर, प्रास्ताविक देवानंद कापटे यांनी केले.


राजवाडय़ात जिजाऊ जन्मोत्सव साजरा




सिंदखेडराजा, १२ जानेवारी
छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा ४१२ वा जन्मोत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजवाडय़ात बुलढाणा जिल्हा परिषद, सिंदखेडराजा पंचायत समिती व सिंदखेडराजा नगर परिषदेच्यावतीने पूजन करून संपन्न झाला.
यावेळी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर, उपाध्यक्ष राम जाधव, पंचायत समिती सभापती शीला शिंगणे, नगर परिषद नगराध्यक्ष बबन म्हस्के, उपाध्यक्ष जगन ठाकरे, जिल्हा परिषद सभापती वैशाली सुपेकर, अभय चव्हाण, प्रभारी मुख्य कार्यपालनाधिकारी संजय कापडणीस यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी हजर होते. यानंतर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधव यांनी केले.
जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून याहीवर्षी मराठा सेवासंघ द्वारा आयोजित शिवविवाह जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म पद्धतीने संपन्न झाला. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेश सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सिंदखेडराजा येथील गजानन प्रल्हाद सवने व संगीता रामकिसन मोहिते, (मांडवा (लोणार) येथील पंढरी रामकिसन मुढ्ढे व गिर्झापूर (वाशीम) येथील नंदा विठ्ठल घायाळ, टाकरखेड वायाळ येथील आनंद प्रल्हाद पवार व तढेगावच्या करुणा नामदेव गवई, वणी येथील दत्ता डोहे व वणीच्या सीमा अस्वले तसेच पुण्याचे संतोष शिंदे व तेर (जि. उस्मानाबाद) येथील शालिनी मासाळे यांचा विवाह या सोहोळ्यात पार पडला.


आज जिजाऊ जन्मोत्सव, सिंदखेडराजा सज्ज!



सिंदखेडराजा, ११ जानेवारी/ वार्ताहर
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊ दशरात्रौत्सव साजरा होत आहे. ३ जानेवारीपासून या सोहोळ्याला सुरुवात झाली असून उद्या १२ जानेवारीला सांगता होणार आहे.
महाराष्ट्रासह देश-विदेशातील पाहुणे मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत पोहोचत आहेत. विविध वैचारिक तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सिंदखेडराजा-जालना मार्गावरील जिजाऊसृष्टी परिसर सज्ज झाला आहे. सुमारे १०० एकराच्या परिसरात भव्य सभामंडप उभारून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, राजवाडा परिसरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. रस्त्यावर स्वागत कमानी उभारून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले जात आहे. शिवभक्तांना वैचारिक खाद्य पुरवण्यासाठी पुस्तकांची दुकाने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच उपाहार गृहाची दुकाने घातली आहे. येणाऱ्या पाहुण्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चौकशी कक्ष, देणगीदारांसाठी देणगी कक्ष उभारण्यात आले आहेत. यामुळे या परिसराला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराव जाधवांचे समाधीस्थळ, रंगमहाल यासह जिजाऊसृष्टीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे या सोहोळ्यावर पॅराग्लायडिंगद्वारे पुष्पवृत्ती केली जाणार आहे.
उद्या १२ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता राजवाडय़ावरील जिजाऊ जन्मस्थळावर मातोश्री जिजाऊंचे पूजन मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखा खेडेकर, नेताजी गोरे, तहसीलदार सुनील शेळके, काँग्रेस नेत्या जयश्री शेळके, विचारवंत डॉ. आ.ह. साळुंके, देवानंद कापसे, राजे शिवाजीराव जाधव, अरविंद गावंडे, पंढरपूरचे बद्रीनाथ महाराज, चनखोरे, कैकाडी महाराज, ‘शंभुराजे’ नाटक फेम सातारा येथील हर्षवर्धन कदम, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या निमित्ताने या ठिकाणी दिवसभर सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. तसेच, मुख्य कार्यक्रमात मराठा विश्व भूषण, जिजाऊ पुरस्काराचे वितरण तसेच, दुपारी २ वाजता शिवधर्मपीठावर नामावंत व्यक्तींचा सत्कार, पुस्तकांचे प्रकाशन व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

उस्मानाबाद,दि.१- जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने देण्यात येणारा ‘जिजाऊ पुरस्कार’ सौ. विमल बलभीम मोरे यांना जाहीर झाला आहे. जिजाऊ जयंतीदिनी बुधवारी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.
जिजाऊ जयंतीनिमित्त समितीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश संपादन केलेल्या महिला, राज्यपातळीवर अजिंक्य ठरलेला श्रीपतराव भोसले हायस्कूलचा महिला संघ, छत्रपती हायस्कूलच्या मुलींचा व्हॉलीबॉल संघ, तसेच उस्मानाबाद आकाशवाणीचे निवेदक संजय मैंदर्गी व आनंद वीर, खो-खो असोसिएशनचे राज्य सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव आदींचा सत्कार या कार्यक्रमात होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, प्रमुख अतिथी म्हणून आमदार राणाजगजीतसिंह पाटील, राज्य सहकारी बँकेचे संचालक विश्वास शिंदे, सत्तार शेख, के. टी. पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद पाटील, शिवसेनेचे अनिल खोचरे, रिपाइंचे राजाभाऊ ओहाळ, मनसेचे अनिल मंजुळे हे उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी सकाळी ९.३० वाजता शहरातील जिजाऊ चौक, बार्शी नाका येथे आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिजाऊ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मधुकर अनभुले, डॉ. सुभाष वाघ, श्याम कदम, राहुल सूर्यवंशी आदींनी केले आहे.
जवान संघटनेच्या वतीने राजगडाच्या पायथ्याशी जिजाऊ जन्मोत्सव साजरा.

.

Thursday, January 6, 2011

जिजाऊ जन्मोत्सव आणि शिवधर्म प्रकटनाचा ६ वा वर्धापन दिन १२ जानेवारी २०११

जिजाऊ जन्मोत्सव आणि शिवधर्म प्रकटनाचा ६ वा वर्धापन दिन १२ जानेवारी २०११

जय जिजाऊ..


दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमाचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे..ह्या वर्षी मराठा विश्वभूषण आणि जिजाऊ पुरस्कार हे शिवधर्मपीठावरून दिले जाणार आहेत..जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.. ३ जानेवारी पासूनच सावित्री-जिजाऊ जन्मोत्सवास सुरवात झाली असून जिजाऊ सृष्टीवर उत्साहाचे वातावरण दिसत आहे..ह्या वर्षी डी वाय पाटील ह्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत..ह्या साठी देशभरातून शिवधर्मी आणि जिजाऊप्रेमी उपस्थित राहणार आहेत.. गेल्या वर्षी शिवधर्म मृत्योत्तर संस्कारांचे प्रकाशन शिवधर्म साहित्य निर्मिती गण आणि विश्व शिवधर्म संसदेच्या वतीने करण्यात आले होते...ह्या वर्षी शिवधर्मसाहित्यात कोणती भर पडणार ह्याबद्दल शिवधर्मियात उत्सुकता आहे..


जिजाऊ सृष्टीवर राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव



मराठा विश्वभूषण पुरस्कार जाहीर

यंदाही १२ जानेवारीला जिजाऊ सृष्टीवर मराठी सेवा संघातर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांचा ४१३ वा जन्मोत्सव सोहोळा मोठय़ा प्रमाणात साजरा होणार आहे.
या सोहोळ्यात यंदाचा मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा मराठा विश्वभूषण पुरस्कार पंढरपूर येथील बद्रीनाथ महाराज तनपुरे, शिव राज महाराज जाधव व शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील या तिघांना तर जिजाऊ पुरस्कार कळमनुरीच्या शाहीर अनसूयाबाई शिंदे व बडोद्याच्या जादूगर मेरीगोल्ड मंदाकिनी जाधव यांना दिला जाणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अमरावती विभागीय अध्यक्ष राजेंद्र आढाव यांनी दिली.
या सोहोळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केरळचे राज्यपाल रा.सू. गवई. त्रिपुराचे राज्यपाल डॉ.डी.वाय. पाटील. शिवराज पाटील, चाकुरकर यांच्यासह मराठा सेवा संघाचे सर्व कक्षांचे अध्यक्ष शिवधर्माचे धर्मसंसद व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहणार आहे. यंदाच्या ४१३ व्या जन्मोत्सव सोहोळ्याच्या नियोजनार्थ नुकतीच जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी मंडळाची बैठक झाली. यात मराठी विश्वभूषण व जिजाऊ पुरस्कारांबद्दल निर्णय झाला.
या बैठकीसाठी सेवा संघाचे नेताजी गोरे, संतोष गाजरे, भरत मानकर, बिग्रेडीयर सुधीर सावंत, सृष्टीचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव देशमुख, शीतल तनपुरे, चंद्रशेखर शिखरे तहसीलदार सुनील शेळके, राजेंद्र आढाव, अण्णासाहेब बुरकूल, प्रशांत खाचणे, सुभाषराव कोल्हे, संजय विरवे, मनोज आखरे, नंदू गावंडे, पप्पू पाटील, भोयर, देवानंद कापसे, विजयकुमार दुबे, विलास पाटील व विनोद पऱ्हाड आदी उपस्थित होते. यात जन्मोत्सव तयारीचे नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. तर सालाबादा प्रमाणे यंदाही जिजाऊ सृष्टीवर ३ जानेवारीपासून जन्मोत्सव सोहोळा मोठय़ा प्रमाणात प्रारंभ होणार आहे.

Sunday, December 26, 2010

आ ह साळुंखे लिखित "शिवराय:संस्कार आणि शिक्षण" ( परमानंदकृत शिवभारताच्या आधारे ) प्रकाशित

आ ह साळुंखे लिखित "शिवराय:संस्कार आणि शिक्षण" ( परमानंदकृत शिवभारताच्या आधारे ) प्रकाशित
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेले परमानंदकृत "शिवभारत" ह्या अस्सल साधनाच्या आधारे शिवरायांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर जिजाऊ आणि शहाजीराजे ह्यांच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा प्रभाव त्यांना छत्रपती पदापर्यंत घेवून गेला.. साळुंखे सरांनी ह्याचा धावता आढावा शिवभारताच्या आधारे घेतला आहे... आ.ह.साळुंखे ह्यांचे हे शिवचरित्रावरील पहिलेच पुस्तक असल्याने चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आणि अपेक्षा आहेत..

Saturday, November 27, 2010

युगनायक महात्मा फुले आणि धर्म



सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून काही तत्त्वांचा प्रसार त्यांनी केला. ईश्र्वर एकच व निर्गुण-निराकार आहे. ईश्र्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका. हे विचार बहुजनांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
त्यांनी `ईश्वर' नव्हे, तर `निर्मिक' असाच शब्द नेहमी वापरला. राजर्षी शाहू महाराजांना प्रेरणा मिळाली ती महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांतूनच ! महात्मा फुलेंना गुरू मानत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन विकासाची चळवळ पुढे नेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व कार्यावर महात्मा फुले यांचाच प्रभाव होता.

भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि तरीही येथील शेतकरी अज्ञानी, कर्जबाजारी, दरिद्री, मागासलेला असा होता (आहे). यामुळेच या समस्या लक्षात घेऊन शेतकर्यांची बाजू मांडण्यास आणि त्यांचे संघटन करण्यास महात्मा फुले यांनी सुरुवात केली.
शेतकरी, शेतमजूर यांच्या हालाखीच्या परिस्थितीचे त्यांनी शेतकर्यांचा आसूड या ग्रंथात वर्णन केले आणि या ठिकाणी शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका परखडपणे मांडली. तसेच शेतकर्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळावे, वार्षिक कृषी प्रदर्शन भरवले जावे, पाणीपुरवठ्यासाठी तलाव-विहिरी-धरणे बांधावीत, पीकसंरक्षणासाठी बंदुक परवाने मिळावेत या मागण्यांचा पाठपुरावा केला. १८८८ साली त्यांनी ड्यूक ऑफ कॅनॉटसमोर भारतीय शेतकर्यांच्या वेषात शेतकर्यांचे प्रतिनिधित्व केले. शेतकर्यांच्या समस्या व त्या अनुषंगाने त्यावरील पर्यायी योजनांची बाजू मांडली.

महात्मा फुले यांनी
असंघटित कामगारांच्या समस्यांचाही विचार केला होता. कामगार संघटक नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. लोखंडे यांनी महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून ही संघटना स्थापन केली होती. हीच भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते. महात्मा फुले काही काळ पुणे नगरपालिकेचे सदस्यही होते. त्यांच्या चळवळीचे केंद्र पुणे हेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धार महात्मा फुले यांनी केल्याचा उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात सापडतो.


आज शिक्षक दिन ...आपणास हार्दिक शिवेच्छा...

Thursday, October 28, 2010

Shahajiraje,Jijausaheb with Shivaji Maharaj


Swarajyasankalpak Shahajiraje Malojiraje Bhosale.

Swarajaprerana Jijausaheb Shahajiraje Bhosale.

SwarajyaNirmata Chhatrapati Shivaji Maharaj.

Monday, September 20, 2010

हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल - प्रबोधनकार

Very Good website on Prabodhankar Keshav Sitaram Thakrey...


visit-

http://www.prabodhankar.com/

congratulations...mr.sachin parab...Great Efforts...

Prabodhankarana manacha mujra.....
-shivdharm seva mandal.

Wednesday, September 8, 2010

Shivdharna's Festival - Bail Pola


Festival of Indian Farmers...Festival of (Sindhu) Indus Civilization..Festival Of Shivdharma...
wishing you a very very happy pola....jay jijau..

Shivdharma Idols


shivdharma Mahamanav...

Saturday, July 24, 2010

jijai publication launched own website...

jijai publication,pune has launched own website...

Jijai Prakashan
Jijabai was the daughter of Lakhuji Jadhavrao, descendent of the Jain kings of Devagiri, and a powerful Sardar at the court of Nizam Shah of Ahmednagar. She was married to Shahji, son of Maloji, who jahagirdar of Pune and Supa and the fortresses of Shivneri and Chakan.
Her strong sense of duty, her courage and fortitude and self-respect were the highlights of her character which were passed on to her son Shivaji, the founder and revivalist of Maratha empire in the enclave of foreign rule in south India.
Jijabai had observed the plight of the land of Marathas being overrun repeatedly by the Moghal of Delhi and the Muslim kings of south.
She was blessed with a son whom she named Shivaji. Shivaji owed his greatness to the inspiration of his mother who implanted in him not only the idea of free Maharashtra but also imbued him with the ideas of tolerance, justice and fair play. These were the virtues that made Shivaji a great king. She was very brave and able administrator. She guided Shivaji to achieve these qualities. Jijabai had taught Shivaji to hold all women in great respect. This code of conduct was rigidly enforced by Shivaji and his lieutenant and counselors. It was also at the inspiration of his mother that Shivaji followed the policy of religious tolerance.

visit-
http://www.jijaiprakashan.com/

congratulations mr.kishore kadu,pune...thanks..

Saturday, April 10, 2010

10th,11th,12th,14th April- Bahujan festivals..


10 th april -Dr.Punjabrao Deshmukh Smrutidin.

11 th April -Mahatma Jyotirao Phule Janmdin.

12 th April -Jijau-Shahjiraje vivah chatushatabdi varsh started..

14 th April -Dr.Babasaheb Ambedkar Janmdin.

Vinamra Abhiwadan...